कुण कुणाल करशी खुणाग
तुला मंतात मालहाजुनाग
कुण कुणाल करशी खुणाग
तुला मंतात मालहाजुनाग
जर्याला तु एवो दे राग
सुबुधीला तुझा तुझाग
आस वागन तुझाग त्याग
धोड सुधारुनिया वाग
धर आता तुशान पनाग
तुला मंतात मालहाजुनाग
एता जाता तुझे ते इशारे
सदा चालू चग हात वारे
तुझा अंगात भरती वारे
तुझा आकलेचे तुटती तारे
बंद जाला तुझा तुण्टुनाग
तुला मंतात मालहाजुनाग
मंता ब्यात तुझा गणाही
तुझा तुलाच कलेन काही
वेड़े जालेत नखर्या पाई
पाई एका जागी नाराही
गेली विश्रून मातार पनाग
तुला मंतात मालहाजुनाग
तुझा गोर गोर अंग
त्यात चोली तुझीती तंग
जो तो पाहोनी होई दंग
फिर शी तरुन पोरा संग
सांगे सानन्द छोड़ाव गुनाग
तुला मंतात मालहाजुनाग
कुना कुनाला करशी कुनाग
तुला मंतात मालहाजुनाग